logo
back-arrow
श्री. अविनाश यादव
सातारा, महाराष्ट्र.
 
पिकाचा प्रकार : ऊस
एकूण क्षेत्र : 8 एकर
display-image
बायोफिट उत्पादनांचा वापरः अविनाश पांडुरंग यादव यांनी मागील 2 वर्षांपासून बायोफिट उत्पादनांचा वापर सुरु केला आहे. ऊस पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जसे की, ऊस उगवण होऊन 3 ते 5 पानांवर आल्यानंतर, फुटवे सुरु झाल्यावर, लहान ऊस बांधणी (बाळ भरणी) आणि मोठ्या भरणीच्या अगोदर त्यांनी बायोफिट स्टीमरीच, बायो-99, इन्टॅक्ट इ. औषधांची फवारणी घेतली. तसेच सुरुवातीच्या महिन्यापासून त्यांनी बायोफिट एन.पी.के. (जीवाणू खत) व बायोफिट शेत ही उत्पादने 20 ते 25 दिवसांच्या अंतराने ठिबक सिंचनाद्वारे जमिनीमध्ये दिली. बायोफिट उत्पादनांचा त्यांना खूप फायदा झाला.
बायोफिट स्टिमरीच व बायोफिट रॅपअपच्या बीज प्रक्रियेमुळे ऊस उगवण 5 ते 7 दिवस अगोदर झाली. ऊसाचे रोप सदृढ आणि सशक्त झाले. नंतरच्या वापरामुळे फुटव्यांची संख्या (15 ते 18 फुटवे) वाढली. त्याचबरोबर ऊसाच्या पेरांची संख्या व लांबी वाढण्यास मदत झाली. ऊसाचे वजन सरासरीपेक्षा जास्त भरले. बायोफिट एन.पी.के. आणि बायोफिट शेत यांच्या वापरामुळे रासायनिक खतावर होणारा खर्च 30 ते 40% नी कमी झाला. जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढल्यामुळे अतिपाण्यामुळे होत असलेले नुकसान कमी झाले. यापूर्वी मिळणारे ऊस उत्पादन आणि बायोफिटच्या वापरामुळे मिळालेले ऊस उत्पादन यामध्ये अविनाश यादव यांना समाधानकारक यश मिळाले.
पुर्वीचे ऊस पीक व बायोफिट ऊस पिकामधील फरकः-
पुर्वीचे ऊस पीक :
  • उत्पादन खर्च प्रतिएकरः रु.50 ते रु.60 हजार
  • सरासरी उत्पादनः 40 ते 45 टन
  • बाजारभावः रु.2500-2700/टन
  • निव्वळ नफा प्रति एकरः रु. 50-55 हजार/एकर
  • जमिनीच्या पोता मधील बदलः मध्यम पोत
बायोफिट ऊस पीक:
  • उत्पादन खर्च प्रतिएकरः रु.50 ते रु.55 हजार
  • सरासरी उत्पादनः 70 ते 75 टन
  • बाजारभावः रु.2500-2700/टन
  • निव्वळ नफा प्रति एकरः रु. 1.10-1.20 लाख/एकर
  • जमिनीच्या पोता मधील बदलः सुधारणा