logo
back-arrow
श्री. बाळासाहेब गर्कळ
बीड, महाराष्ट्र.
 
पिकाचा प्रकार : कापूस
एकूण क्षेत्र: 2.5 एकर
display-image
बाळासाहेब गहिनीनाथ गर्कळ हे एक पदवीधर शेतकरी आहेत. गर्कळ यांची एक वेगळी ओळख पंचक्रोशीमध्ये निर्माण झाली आहे. गर्कळ गेल्या 16 वर्षापासून कमी भांडवल व कमी पाण्यामध्ये व्यावहारिकता ठेऊन शेतीमध्ये कार्यरत आहेत. प्रत्येक वर्षी 2 ते 2.5 एकर क्षेत्रावर कापूस-वाण ‘महिको जंगीचे’ उत्पादन घेतात.
कापूस पिकाचे उत्पादन घेत असताना त्यांना पिकावर येणारी बोंडआळी, रसशोषक किडीचा प्रादुर्भाव बर्‍याच प्रमाणात होत असे. त्याचा परिणाम त्यांच्या कापूस उत्पादनावर होत असे. 1 एकरामधून त्यांना सरासरी 5.5 क्विंटल उत्पादन मिळत असे. बाजारभावानुसार त्यांना 1 एकर कापूस पिकामधून खर्च वजा करता 8,000 ते 9,000 रु नफा शिल्लक रहात होता. किडीच्या प्रादुर्भावामुळे कापूस बोंडाचा दर्जा खालावत असे. त्यामुळे त्यांना बाजारभाव कमी मिळत असे.

बाळासाहेब गर्कळ यांनी मागील खरिप हंगामामध्ये कापूस उत्पादन घेत असताना बायोफिट उत्पादनांचा वापर केला. कापूस वाढीच्या मुख्य अवस्थेमध्ये त्यांनी बायोफिट स्टिमरिच, बायो-99 च्या चार वेळा फवारण्या घेतल्या. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये त्यांना पिकाची वाढ सुयोग्य झालेली दिसली. तसेच जास्तीत जास्त फुलकळ्यांचे बोंडांमध्ये रुपांतर झाले. रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्यांनी बायोफिट इन्टॅक्ट, बायो-99 च्या 3 वेळा फवारण्या घेतल्या.
पूर्वीची कपासाची शेती आणि बायोफिट कापसाची शेती यांमधील फरक-
पूर्वीची कापूस शेती:
  • उत्पादन खर्च प्रति एकरः रु. 21,500
  • Average yield: 5.5 quintal
  • बाजारभाव प्रति क्विंटलः रु 5,500
  • एकूण उत्पादन प्रति एकरः रु 30,250
  • निव्वळ नफा प्रति 1 एकरः रु 8,750
बायोफिट कापूस शेती:
  • उत्पादन खर्च प्रति एकरः रु. 26,500
  • सरासरी उत्पादन प्रति एकरः 8.5 क्विंटल
  • बाजारभाव प्रति क्विंटलः रु 6,500
  • एकूण उत्पादन प्रति एकरः रु 55,250
  • निव्वळ नफा प्रति 1 एकरः रु 28,750
बायोफिट उत्पादनांच्या वापरामुळे गेल्या वर्षी इतर शेतकर्‍यांच्या तुलनेत त्यांच्या कापूस पिकावर किडीचा प्रादुर्भाव कमी झाला व त्यांना बोंडांची गुणवत्ता टिकण्यास मदत झाली. कालांतराने उत्पादनामध्ये सुध्दा वाढ दिसून आली. 1 एकर क्षेत्रामधून त्यांना 8.5 क्विंटल कापूस उत्पादन मिळाले. मागील वर्षी त्यांना जवळपास 6500/- प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.