logo
back-arrow
श्री.चंदन कुमार बेहेरा
जाजपुर, ओडिशा.
 
पिकाचा प्रकार : भात
display-image
श्री. चंदन कुमार बेहेरा दरवर्षी आपल्या शेतामध्ये भाताचे उत्पादन घेतात. भात शेतीमध्ये ते विविध रासायनिक खतांचा वापर करत होते. परंतु इतर शेतकर्‍यांप्रमाणेच त्यांना हव्या त्या प्रमाणात उत्पादनात वाढ दिसत नव्हती याउलट खर्च दरवर्षी वाढत चालला होता. या समस्येवर कोणतेही योग्य समाधान त्यांना मिळत नव्हते.
अश्यातच त्यांना मागील वर्षी नेटसर्फच्या बायोफिट जैविक उत्पादनांची माहिती मिळाली. अगोदर त्यांनी बायोफिट वापरुन शेती करणार्‍या काही यशस्वी शेतकर्‍यांशी संवाद साधला व पुरेशी खात्री केल्यानंतर त्यांनी बायोफिटचे जैविक तंत्रज्ञान वापरुन भात शेती करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी चालू हंगामामध्ये भात पिकासाठी बायोफिट उत्पादनांचा वापर केला. सर्व प्रथम त्यांनी बायोफिट स्टिमरिच वापरून बीजप्रक्रिया केली, परिणामी त्यांना उगवण क्षमतेमध्ये प्रचंड सुधारणा झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी बायोफिट स्टिमरिच व बायो-99 यांची प्रत्येकी 15 ते 20 दिवसांच्या अंतराने 3 वेळा फवारणी घेतली. बायोफिट एन.पी.के. आणि बायोफिट शेत 1 लि. प्रत्येकी असे द्रावण त्यांनी पाटपाण्याच्या द्वारे 3 वेळा महिन्याच्या अंतराने दिले. त्यामुळे भात पिकाची वाढ जोमाने झाली, फुटव्यांची संख्या वाढली आणि पीक हिरवेगार झाले. त्याचा फायदा त्यांना उत्पादन वाढीसाठी झाला.
पुर्वीचे भात पीक व बायोफिट भात पिकामधील फरकः-
पुर्वीचे भाताचे पीक :
  • उत्पादन खर्च प्रति 1 एकरः रु.15000
  • सरासरी उत्पादनः 23 क्विंटल प्रति एकर
  • बाजारभावः रु.1200 प्रति क्विंटल
  • निव्वळ नफा प्रति एकरः रु.12600
बायोफिट भाताचे पीक:
  • उत्पादन खर्च प्रति 1 एकरः रु.12500
  • सरासरी उत्पादनः 27 क्विंटल प्रति एकर
  • बाजारभावः रु.1200 प्रति क्विंटल
  • निव्वळ नफा प्रति एकरः रु.19900
तसेच बायोफिट जैविक उत्पादनांचा वापर केल्यामुळे रासायनिक खते आणि औषधांचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी झाला. त्यांच्या शेतीतील बदल बघून परिसरातील इतर शेतकरी देखील प्रभावित झाले आहेत व बायोफिट उत्पादने वापरण्यास उत्सुक आहेत. श्री. बेहेरा हे बायोफिट उत्पादनांमुळे समाधानी आहेत व आपल्या इतर सर्व शेतीत देखील याच उत्पादनांचा वापर करणार आहेत.