logo
back-arrow
श्री. देवीदास वानखेड़े
बुलढाणा, महाराष्ट्र.
 
पिकाचा प्रकार : संत्री
एकूण क्षेत्र : 60 एकर
display-image
श्री. देवीदास सुखदेव वानखडे यांच्याकडे 60 एकर शेती असून 38 एकर क्षेत्रफळामध्ये संत्र्याची लागवड आहे.जुलै 2018 पासून, श्री. वानखडे यांनी नेटसर्फ कंपनीचे बायोफिट जैविक प्रॉडक्टचा वापर त्यांच्या संत्रा या पिकावरती चालू केला. त्यांनी 4 एकर क्षेत्रफळामध्ये 800 नवीन झाडांची लागवड केली आणि या झाडांवरती पूर्णपणे बायोफिट प्रॉडक्टचा वापर करणे सुरु केले.
या झाडांना बायोफिट एन.पी.के., बायोफिट शेत व बायोफिट स्टिमरिच या प्रॉडक्टची लागवडीपासून ड्रिंचिंग करण्यात आली (ड्रिप मधून) यांचा वापर सुरु केल्यानंतर त्यांना खूप चांगले परिणाम दिसुन आले. त्यानंतर त्यांनी फवारणीमधून बायोफिट स्टिमरिच, बायोफिट रॅपअप, बायोफिट इंटॅक्ट, बायोफिट बायो-99 या प्रॉडक्टचा वापर सुरु केला. याचा उत्तम परिणाम दिसून आला.

त्यांचा शेतीवरील खर्च अर्ध्यावर आला. 2 वर्षांची झाडे 4 वर्षांच्या झाडांची बरोबरी करु लागली. भरपूर प्रमाणात पानांची संख्या तसेच पानांचा आकार व पानांची जाडी भरपूर दिसुन आली. झाडांची उंची भरपूर प्रमाणात दिसुन आली. खोड जाड झाले व खोडाच्या सालीमध्ये चकाकी दिसू लागली. त्याचप्रमाणे फळांची गुणवत्ता खालील प्रमाणे वाढली.
पूर्वीची संत्र्याची शेती आणि बायोफिट संत्र्याची शेती यांमधील फरक-
पूर्वीची संत्र्याची शेती:
  • उत्पादन खर्च प्रति एकरः रु. 42 हजार
  • सरासरी उत्पादनः 7.5 टन प्रती एकर
  • बाजारभावः रु 22 प्रति किलो
  • निव्वळ नफा प्रति 1 एकरः रु 1 लाख 23 हजार
  • एकूण उत्पादनः रु 1 लाख 65 हजार
बायोफिट संत्र्याची शेती:
  • उत्पादन खर्च प्रति एकरःरु. 48 हजार
  • सरासरी उत्पादनः 9 टन प्रती एकर
  • बाजारभावः रु 26 प्रति किलो
  • निव्वळ नफा प्रति 1 एकरः रु 1 लाख 86 हजार
  • एकूण उत्पादनः रु 2 लाख 34 हजार
फळगळ कमी होऊन फळांची संख्या वाढली. फळांचा उत्तम दर्जा दिसुन आला. फळांना चकाकी आली तसेच त्यांचा आकार मोठा झाला. फळांमध्ये भरपूर प्रमाणात रस व गोडवा आला. चांगले परिणाम कमी खर्चात येऊ लागल्याने श्री. वानखडे यांनी आपल्या संपूर्ण शेतजमीनीवर बायोफिट प्रॉडक्टचा नियमित वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.