logo
back-arrow
श्री. धनाजी ढवळे
सोलापुर, महाराष्ट्र.
 
पिकाचा प्रकार : ऊस
एकूण क्षेत्र: 5 एकर
display-image
धनाजी ढवळे हे पारंपारिक व्यवसाय म्हणून शेती करत आहेत. शेती सोबत जोडव्यवसाय म्हणून पशुपालन आणि ट्रॅक्टर त्यांच्याकडे आहे.दरवर्षी त्यांच्याकडे 4 ते 5 एकर ऊस पिकाची शेती केली जाते. ऊसाचे को.86032 ही जात ते प्रामुख्याने घेत आहेत. ऊसाची लागण ते आडसाली (सप्टेंबर-ऑक्टोबर) हंगामामध्ये करतात. ऊस उत्पादन घेत असताना त्यांना हुमणी या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत असे. त्यामुळे ऊस 12 ते 14 महिन्याचा झाल्यानंतर त्यांना हुमणीच्या प्रादुर्भावामुळे ऊस वजनामध्ये घट होत होती. तसेच अतिवृष्टी झाल्यानंतर ऊसाच्या पांढर्‍या मुळांची वाढ थांबत होती. परिणामी ऊस वाढीला फटका बसत असे.
चालू वर्षीच्या आडसाली ऊस पिक घेत असताना धनाजी ढवळे यांनी नेटसर्फ कंपनीचे बायोफिट उत्पादने वापरली.

ऊस लागणीच्या वेळेस आणि मोठी भरणी करतेवेळी त्यांनी खताची सर्व मात्रा पूर्ण केली. त्याचबरोबर बायोफिट एन.पी.के व बायोफिट शेत याची 200 लि. पाण्यामध्ये प्रत्येकी 1 लि. एन.पी.के. व शेत असे द्रावण ठिबक सिंचनामध्ाून प्रत्येक महिन्याला असे 5 वेळा वापरले. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली. तसेच जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचा जास्तीत जास्त फायदा ऊस पिकाला झाला. अतिवृष्टीमध्ये सुध्दा ऊसाच्या पांढर्‍या मुळाची वाढ चांगल्या प्रकारे झाली.
पूर्वीची ऊसाची शेती आणि बायोफिट ऊसाची शेती यांमधील फरक-
पूर्वीची ऊस शेती:
  • उत्पादन खर्च प्रति एकरः रु. 65,000
  • सरासरी उत्पादन प्रति एकरः 67 टन
  • ऊस विक्री दरः रु 2500 टन
  • एकूण उत्पादन प्रति एकरः रु 1,67,500
  • निव्वळ नफा प्रति 1 एकरः रु 1,02,500
बायोफिट ऊस शेती:
  • उत्पादन खर्च प्रति एकरः रु. 73,000
  • सरासरी उत्पादन प्रति एकरः 107 टन
  • ऊस विक्री दरः रु 2500 टन
  • एकूण उत्पादन प्रति एकरः रु 2,67,500
  • निव्वळ नफा प्रति 1 एकरः रु 1,94,500
बायोफिट स्टिमरिच, बायो-99 व बायोफिट शेत या मिश्रणाच्या त्यांनी (15 ते 20 दिवसांच्या अंतराने) 4 वेळा फवारणी घेतल्या. त्यामुळे ऊसाची वाढ चांगली झाली. पेरांची संख्या वाढली, तसेच 2 पेरांमधील अंतर वाढले. त्यांना चालू वर्षी 1 एकरामध्ये 107 टन ऊस उतारा त्यांना मिळाला.