logo
back-arrow
जनार्दन गणपतराव सावंत,
नांदेड, महाराष्ट्र.
 
पिकाचा प्रकार : पपई
एकूण क्षेत्र : बागायती - 16 एकर, जिरायती - 2 एकर
display-image
बायोफिट उत्पादनांचा वापर : चालू वर्षामध्ये जनार्दन गणपतराव सावंत यांनी पपई पिकासाठी योग्य मशागत, खते, पाणी व सोबत बायोफिट ची उत्पादने वापरली. पपई रोपांची लागवड केल्यानंतर सुरुवाती पासून त्यांनी फवारणीसाठी बायोफिट स्टीमरिच व बायो 99 यांचा पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये 5 ते 6 वेळा वापर केला. त्यामुळे त्यांच्या पिकाची निरोगी आणि सुयोग्य वाढ होण्यास मदत झाली. बायोफिट इन्टॅक्ट च्या वापरामुळे इतरांच्या तुलनेत त्यांच्या बागेमध्ये रसशोषक किटकांचा प्रादुर्भाव कमी झाला. तसेच रासायनिक किटनाशकाच्या वापरामध्ये घट झाली. त्यामुळे परागीभवनासाठी येणार्‍या मधमाश्यांची संख्या वाढली. पपईमध्ये येणार्‍या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांनी बायोफिट रॅपअपची दर 15-20 दिवसांच्या अंतराने फवारणी केली तसेच त्याचा ठिबक सिंचनाद्वारे वापर केला.
खतांचे व्यवस्थापन करण्यासाठी सावंत यांनी रासायनिक खतांबरोबर जैविक खतांचा योग्य पद्धतीने वापर केला. त्यांनी बायोफिट NPK आणि बायोफिट शेत ही उत्पादने ठिबक सिंचनाद्वारे वापरली. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता वाढली. जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांची पिकासाठी उपलब्धता वाढली, त्यामुळे पपई फळाचे वजन वाढण्यास मदत झाली.
पुर्वीचे पपई पीक व बायोफिट पपई पिकामधील फरक
पुर्वीचे पपई पीक :
  • उत्पादन खर्च प्रति 1 एकर : रु.1 लाख 10 हजार
  • सरासरी उत्पादन : 21 टन (1500 ग्रॅम प्रती पपई सरासरी वजन)
  • बाजारभाव : रु.10 प्रति किलो
  • निव्वळ नफा प्रति एकर : रु.1 लाख
  • जमिनीच्या पोता मधील बदल : जमीन कडक असायची, पाणी दिल्यानंतर क्षारासारखा पांढरा रंग यायचा.
बायोफिट पपई पीक :
  • उत्पादन खर्च प्रति 1 एकर : रु.1 लाख 15 हजार
  • सरासरी उत्पादन : 24.5 टन (1800-2000 ग्रॅम पपई सरासरी वजन)
  • बाजारभाव : रु.12 प्रति किलो
  • निव्वळ नफा प्रति एकर : रु.1.75 लाख
  • जमिनीच्या पोता मधील बदल : पाणी दिल्यानंतर क्षारासारखा पांढरा रंग दिसणे कमी झाला.
बायोफिट च्या उत्पादनांच्या वापरामुळे सावंत यांना चालू वर्षी अतिशय समाधानकारक उत्पादन मिळाले.त्यांना चालू हंगामात 2.5 एकरामध्ये 58 टन उत्पादन मिळाले. तसेच एका पपईचे वजन सरासरी 1.8 किलो ते 2 किलो भरलेे, बाजारभावसुद्धा त्यांना रु.12 प्रति किलो मिळाला.