logo
back-arrow
श्री. जयंता बारुआ
दिब्रुगड, आसाम.
 
पिकाचा प्रकार : चहा
display-image
जयंता बारुआ यांना त्यांच्या चहाच्या मळ्यामध्ये रासायनिक खतांचा तसेच पानांच्या उत्तम वाढीसाठी कीटकनाशकांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर करावा लागत असे. यामुळे त्यांचा उत्पादन खर्च वाढला होता तरीही उत्पादन त्या प्रमाणात मिळत नव्हते. पानांची गुणवत्ताही खूप मोठी समस्या बनली होती. बाजारभाव देखील मनाप्रमाणे मिळत नव्हता.
त्यांनी नेटसर्फच्या उत्पादनांची माहिती मिळाल्यावर त्यांचा वापर आपल्या चहाच्या मळ्यावर करण्यास सुरुवात केली, त्यांनी चहा पानांच्या तोडणीच्या एक दिवसा नंतर बायोफिट रॅपअप, बायोफिट बायो-99 चा उपयोग केला. तसेच पानफुटीच्या 6 ते 7 दिवसां नंतर परत बायोफिट स्टिमरिच, बायोफिट बायो-99 चा उपयोग केला. जेव्हा पाने 2 इंच ते 3 इंच आकाराची होतात तेव्हा परत एकदा बायोफिट एन.पी.के आणि बायोफिट शेत चा वापर केला.

बायोफिट प्रॉडक्टस्च्या वापरा आधी युरिआचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत होता. परंतू बायोफिटच्या वापरानंतर युरिआच्या वापराची गरज पहिल्या पेक्षा खुपच कमी झाली.
पूर्वीची चहाची शेती आणि बायोफिट चहाची शेती यांमधील फरक-
पूर्वीची चहाची शेती:
  • उत्पादन खर्च प्रति एकरः रु. 10 ते 12 हजार
  • सरासरी उत्पादनः 25 ते 28 क्विंटल
  • बाजारभावः रु 18 ते 20 प्रति किलो
  • निव्वळ नफा प्रति 1 एकरः रु 35 ते 44 हजार
बायोफिट चहाची शेती:
  • उत्पादन खर्च प्रति एकरः रु. 7 ते 8 हजार
  • सरासरी उत्पादनः 32 ते 35 क्विंटल
  • बाजारभावः रु 18 ते 20 प्रति किलो
  • निव्वळ नफा प्रति 1 एकरः रु 50 ते 62 हजार
बायोफिट उत्पादनांच्या वापरामुळे, नवीन पानांची फूट खूप मोठ्या प्रमाणावर झाली. पाने हिरवीगार व निरोगी असल्यामुळे पानांचा दर्जा व गुणवत्ता सुधारली व बाजारभाव देखील जास्त मिळाला.

रासायनिक खतांमुळे होणारे पिकांचे व जमिनीचे नुकसान देखील कमी झाले. या उत्पादनांच्या वापरामुळे जयंता बारुआ खूप समाधानी आहेत. आता ते इतर चहा मळ्याच्या शेतकर्‍यांना देखील नेटसर्फच्या बायोफिट उत्पादनांच्या वापराचा सल्ला देत आहेत.