logo
back-arrow
श्री. मन्सूर पठाण
यवतमाळ, महाराष्ट्र.
 
पिकाचा प्रकार : सोयाबिन
एकुण क्षेत्रः 1.5 एकर
display-image
मन्सूर जुमा पठाण हे कृष्णापूर गावचे एक होतकरु व तरुण शेतकरी असून ते गेल्या 15 वर्षांपासून शेतीचा व्यवसाय करत आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांची शेती कोरडवाहू पध्दतीची होती. पण कालांतराने त्यांनी विहिरीच्या माध्यमातून तिचे बागायतीमध्ये रुपांतर केले.
मन्सूर पठाण प्रत्येक वर्षी नगदी पिकांमध्ये सोयाबीन जे.एस.335 जातीचे वाण घेत आहेत. त्यांचे 1 ते 1.5 एकर क्षेत्र हे सोयाबिन पिकासाठी असते. त्यासाठी त्यांना प्रती एकर 12 ते 13 हजार रु. खर्च येत असे. सरासरी त्यांना 8 ते 8.5 क्विंटल उतारा मिळत होता.

सोयाबिन पीक घेत असताना त्यांच्या शेतावर शेंग पोखरणारी कीड, तांबेरा रोग यांचा प्रादूर्भाव प्रत्येक वर्षी होत होता. त्यामुळे त्यांना अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळत नव्हते. सोयाबिन दाणे बारीक आकाराचे असत व त्यांवर डाग पडलेले असायचे. या पिकासाठी त्यांना प्रति क्विंटल रु. 3800 ते 4000 बाजारभाव मिळत होता.
पूर्वी घेत असलेले सोयाबिन पीक आणि बायोफिट सोयाबिन पीक यांमधील फरक-
पूर्वीची सोयाबिन शेती:
  • उत्पादन खर्च 1 एकर साठीः रु. 12 हजार 500
  • एकुण उत्पादन 1 एकरः 8 क्विंटल
  • बाजारभावः रु. 3800 प्रति क्विंटल
  • एकुण उत्पन्न रु.: 30 हजार 400
  • निव्वळ नफा एकरः रु. 17 हजार 900
बायोफिट सोयाबिन शेती:
  • उत्पादन खर्च 1 एकर साठीः रु. 13 हजार 500
  • एकुण उत्पादन 1 एकरः 10.5 क्विंटल
  • बाजारभावः रु. 4200 प्रति क्विंटल
  • एकुण उत्पन्न रु.: 44 हजार 100
  • निव्वळ नफा एकरः रु. 30 हजार 600
मन्सूर पठाण यांनी चालू हंगामामध्ये खरिप पिक घेत असताना पारंपारिक मशागतीसोबत बायोफिट उत्पादनांचा वापर केला. त्यांनी सोयाबिन पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये बायोफिट स्टीमरिच आणि बायो-99 व बायोफिट शेत यांच्या मिश्रणाच्या 3 वेळा फवारण्या घेतल्या. त्याचा फायदा त्यांना अतिशय चांगल्या पध्दतीने मिळाला.

सोयाबिन पिकाचा शाखीय विकास चांगला झाला. फुटव्यांची संख्या वाढली. फुलकळीचा विकास चांगला झाला. पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी बायोफिट रॅपअप, फुलकळीनंतर 2 वेळा, 20 दिवसांच्या अंतराने फवारणी घेतली. त्याचा फायदा त्यांना तांबेरा रोगापासून होणारे नुकसान थांववण्यामध्ये झाला. चालू खरीप सोयाबिनच्या शेंगा चांगल्या भरल्या आहेत. दाण्यांचा आकार सुध्दा मोठा मिळाला आहे. त्यांना चालू वर्षी जवळपास 10.5 क्विंटल सोयाबिन उतारा मिळाला आहे.