logo
back-arrow
श्री.रामचंद्र कर्मवीर
बिदर, कर्नाटक.
 
पिकाचा प्रकार : पपई
एकूण क्षेत्र: 2.5 एकर
display-image
श्री रामचंद्र कर्मवीर हे आपल्या अडीच एकर शेतामध्ये पपईचे पीक घेतात. त्यांच्याकडे एकूण 3000 पपईची झाडे आहेत. पपई शेतीमध्ये ते वेगवेगळ्या रासायनिक खतांचा वापर करत होते त्यामुळे मातीमधील पाणी शोषून घेण्याची क्षमता खूप कमी झाली होती. तसेच गांडूळांची संख्या कमी झाली होती. परिणामी जमिनीचा कस कमी होऊन उत्पादकता सुध्दा कमी झाली होती.
काही महिन्यांपूर्वी त्यांना नेटसर्फच्या बायोफिट जैविक उत्पादनांची माहिती मिळाली. कर्मवीर यांनी बायोफिट उत्पादने वापरुन शेती करण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम त्यांनी बायोफिट शेत आणि बायोफिट एन.पी.के एकरी 1 लि. प्रमाणे महिन्याच्या पहिल्या रविवारी फवारणी केली. त्याचप्रमाणे बायोफिट स्टिमरिच आणि बायो-99 यांची प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला फवारणी केली. आणि महिन्यातून दोनदा बायोफिट रॅपअपची फवारणी केली.

या सर्वांचा त्यांना पिकावरती चांगला परिणाम दिसून आला. जमिनीमध्ये पाणी साठून रहाण्याची क्षमता वाढली. त्यामुळे गांडूळांची संख्या वाढली आणि गांडूळांमुळे माती भुसभूशीत झाली. बायोफिट स्टिमरिच मुळे पानांचा आकार वाढला, त्याचबरोबर फुलांची गळती थांबून त्यांची संख्या वाढून प्रत्येक फुलाचे फळामध्ये रुपांतर झाले. बायोफिट रॅपअपमुळे यावर्षी फळांवरती पडणारा रोगाचा प्रादुर्भाव नाहीसा झाला. रसशोषक किडी येऊ नयेत याकरीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बायोफिट इन्टॅक्टच्या 2 वेळा फवारण्या घेतल्या. तसेच त्यांचा रासायनिक खतांवरील खर्च इतरांच्या तुलनेमध्ये कमी झाला.
पुर्वीचे पपई पीक व बायोफिट पपई पिकामधील फरक -
पुर्वीचे पपई पीक :
  • उत्पादन खर्च प्रति 1 एकरः रु.1 लाख 10 हजार
  • सरासरी उत्पादनः 21 टन
  • बाजारभावः रु.10 प्रति किलो 1500 ग्रॅम प्रती पपई सरासरी वजन
  • निव्वळ नफा प्रति एकरः रु.1 लाख
बायोफिट पपई पीक :
  • उत्पादन खर्च प्रति 1 एकरः रु.1 लाख 15 हजार
  • सरासरी उत्पादनः 24.5 टन
  • बाजारभावः रु.12 प्रति किलो 1800-2000 ग्रॅम पपई सरासरी वजन
  • निव्वळ नफा प्रति एकरः रु.1.75 लाख
श्री. कर्मवीर सांगू इच्छितात की, एक शेतकरी म्हणून रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करुन जैविक पध्दतीने शेतीची उत्पादकता वाढवणे, ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.