logo
back-arrow
सुदर्शन कांजाळे,
नांदेड, महाराष्ट्र.
 
पिकाचा प्रकार : हळद
एकूण शेती क्षेत्र : 9 एकर
display-image
नांदेड येथील सुदर्शन कांजाळे गेली अनेक वर्षे किमान 1.5 एकर क्षेत्रामध्ये हळदीचे पीक घेत आहेत. त्यासाठी आवश्यक ती लागणारी मशागत त्याचबरोबर शेणखत, रासायनिक खते इत्यादींचा ते वापर करीत होते.
बायोफिट उत्पादनांचा वापर : कंपनीच्या मार्गदर्शनानुसार सुदर्शन कांजाळे यांनी मागील वर्षी 1.5 एकर हळदीसाठी बायोफिटची जैविक कृषी उत्पादने वापरली. सुरुवातीची हळद बियाणे प्रक्रिया त्यांनी बायोफिट स्टिमरिच आणि बायोफिट रॅपअप या उत्पादनांचा वापर करुन केली. त्यामुळे त्यांची उगवण क्षमता वाढून ती उगवण सरासरी 5 ते 7 दिवस अगोदर झाली.

हळदीची 3 ते 4 पानांवर उगवण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बायोफिट स्टिमरिच, बायोफिट बायो-99, बायोफिट शेत यांच्या 20 ते 25 दिवसांच्या अंतराने 4 फवारण्या घेतल्या. त्याचा फायदा त्यांना पिकाची सदृढ व निरोगी वाढ होण्यासाठी झाला. हळदीच्या कंदाचा आकार व फुटवे वाढण्यास मदत झाली.
पुर्वीचे हळद पीक व बायोफिट हळद पिकामधील फरक
पुर्वीचे हळद पीक :
  • उत्पादन खर्च प्रति 1.5 एकर : रु.60 ते रु.75 हजार
  • सरासरी उत्पादन : 30 ते 35 क्विं.
  • बाजारभाव : रु.6,000 प्रति क्विंटल
  • निव्वळ नफा प्रति 1.5 एकर : रु. 1.35 लाख
  • जमिनीच्या पोता मधील बदल : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे कठीण पोत
बायोफिट हळद पीक :
  • उत्पादन खर्च प्रति 1.5 एकर : रु.50 ते रु.55 हजार
  • सरासरी उत्पादन : 42 क्विंटल
  • बाजारभाव : रु.6,500 प्रति क्विंटल
  • निव्वळ नफा प्रति 1.5 एकर : रु. 1.78 लाख
  • जमिनीच्या पोता मधील बदल : जमिन भुसभुशीत झाली.
त्याचबरोबर त्यांनी बायोफिट एन.पी.के. व बायोफिट शेत हे पाण्यासोबत जमिनीमध्येही वापरले. या उत्पादनांचा फायदा त्यांना जमिनीचा पोत सुधारण्यासाठी झाला. तसेच रासायनिक खतांवरील अवलंबीत्व कमी होण्यास मदत झाली. जमीन भुसभुशीत झाल्यामुळे हळदीचे कंद वाढण्यास आणि पसरण्यास मदत झाली. सुदर्शन कांजाळे यांना बायोफिट उत्पादनांच्या वापरामुळे या वर्षी 1.5 एकरामध्ये 42 क्विंटल हळदीचे उत्पादन मिळाले.