logo
back-arrow
श्री. विक्रम निकम
सातारा, महाराष्ट्र.
 
पिकाचा प्रकार : आले
एकुण क्षेत्र: 12 एकर
display-image
विक्रम महादेव निकम गेली 8 ते 10 वर्षे आले पीक घेत आहेत. आले पीक घेत असताना कंदकुज आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव व त्यावरील उपाय यामध्ये बरेच श्रम वाया जात होते. या रोगांमुळे पिकाची वाढ व्यवस्थीत होत नव्हती. त्याचा परिणाम मालाच्या गुणवत्तेवरही होत होता. आल्याची फणी अर्धवट कुजल्यासारखी होत होती. त्यामुळे त्यांना बाजारभाव कमी मिळत असे.
आले लागवड करत असताना त्यांनी आले बियाणे कंद बीजप्रक्रिया बायोफिट स्टिमरिच व बायोफिट रॅपअपच्या द्रावणामध्ये केली. त्यामुळे आले पिकाची उगवण 5 ते 6 दिवस अगोदर झाली.

बायोफिट स्टिमरिच, बायो-99 आणि बायोफिट इंन्टॅक्ट याची 20 ते 25 दिवसाच्या अंतराने त्यांनी फवारण्या घेतल्या त्याचा फायदा त्यांना पिकाची सुयोग्य वाढ होण्यासाठी झाला. पिकाचा शाखीय विकास चांगला झाल्यामुळे आले पिकाचे कंद पोसण्यासाठी मदत झाली.
पूर्वी घेत असलेले आले पिक आणि बायोफिट आले पिक यांमधील फरक-
पूर्वीची आल्याची शेती:
  • उत्पादन खर्च प्रति एकरः रु. 1 लाख 50 हजार
  • सरासरी उत्पादनः 125 क्विंटल
  • बाजारभावः रु 2600 प्रति क्विंटल व मध्यम दर्जा
  • निव्वळ नफा प्रति 1 एकरः रु 1 लाख 75 हजार
  • जमिनीची प्रतवारीः कठिण
बायोफिट आल्याची शेती:
  • उत्पादन खर्च प्रति एकरः रु. 1 लाख 70 हजार
  • सरासरी उत्पादनः 180 क्विंटल
  • बाजारभावः रु 2650 प्रति क्विंटल व चांगला दर्जा
  • निव्वळ नफा प्रति 1 एकरः रु 3 लाख 10 हजार
  • जमिनीची प्रतवारीः भुसभुशीत
कंदकुज व इतर बुरशीजन्य रोग येऊ नयेत यासाठी निकम यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बायोफिट रॅपअप ठिबक सिंचनाद्वारे तसेच फवारणीद्वारे महिन्याच्या अंतराने 4 वेळा वापरले. त्यामुळे पूर्वी आले पीक घेत असताना कंदकुज मुळे होत असलेले नुकसान कमी झाले. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी बायोफिट एन.पी.के. आणि बायोफिट शेत याचा वापर ठिबक सिंचनाद्वारे महिन्याच्या अंतराने 3 वेळा केला. त्यामुळे जमिन भुसभुशीत होऊन तिची सुपिकता वाढली, तसेच पिकाची सुयोग्य वाढ झाली.

बायोफिट उत्पादनांच्या वापराचा विक्रम निकम यांना चांगला फायदा झाला.