logo
back-arrow
श्री. जहीर अब्बास मंडल
बांकुरा, पश्चिम बंगाल.
 
माश्यांचा प्रकार : रोहू, मीगल कार्प (मेरिक) तसेच कटला
एकूण मत्स्यशेती - १५० एकर
display-image
जहीर अब्बास मंडल यांनी मागील २ महिण्यापासून बायोफिट ऍक्वा उत्पादनांचा वापर आपल्या त्यांच्या मत्स्यशेतीमध्ये सुरु केला आहे. रोहू, मीगल कार्प (मेरिक) तसेच कटला या माश्यांच्या मत्स्यपालन तलावामध्ये प्रथम त्यांनी ऍक्वा क्लिअर या उत्पादनाचा वापर १ किलो प्रति एकर प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने ३ वेळा व ऍक्वा कल्चर या उत्पादनाचा वापर १ लिटर प्रति एकर या प्रमाणात २ वेळा केला आहे. तसेच ऍक्वा फीड कॉन्सन्ट्रेट चा वापर मत्स्यखाद्याबरोंबर १० ग्रॅम प्रति किलो खाद्य या प्रमाणात केला. बायोफिट ऍक्वा उत्पादनांचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे.
ऍक्वा क्लिअर च्या वापरामुळे तलावाच्या पाण्यातील हानिकारक अमोनियायुक्त घटकांचे प्रमाण कमी झाले तसेच पाण्यातील ऑक्सिजन ची पातळी वाढण्यास मदत झाली. त्याचबरोबर पाण्याच्या इतर भौतिक गुणधर्मांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधार होण्यास मदत मिळाली. ऍक्वा कल्चर मुळे पाण्यातील गढूळपणाची समस्या दूर होऊन, जैविक घटकांचे योग्य विघटन झाले. माश्याची चयापचय क्रिया सुधारन्यास मदत मिळाली. ऍक्वा फीड कॉन्सन्ट्रेट मुळे माश्यांच्या शरीरातील प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वांची कमतरता भरून निघाली, माश्यांचे वजन वाढले, माश्यांची मर मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आली परिणामी २ महिन्यात जहीर मंडल यांना त्यांच्या मत्स्यशेतीत खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे .
यापूर्वीची मत्स्यशेती आणि बायोफिट मत्स्यशेती यामधील फरक -
यापूर्वीची मत्स्यशेती :
  • उत्पादन खर्च प्रति एकर : रु १० ते १२ हजार
  • सरासरी उत्पादन : २ ते २. ५ क्विंटल
  • बाजारभाव : रु १०० ते १२० प्रति किलो
  • निव्वळ नफा : रु २५ ते ३० हजार
बायोफिट मत्स्यशेती :
  • उत्पादन खर्च प्रति एकर : रु ६ ते ७ हजार
  • सरासरी उत्पादन : ४ ते ४.५ क्विंटल
  • बाजारभाव : रु १५० ते १७० प्रति किलो
  • निव्वळ नफा : रु ५० ते ६० हजार
मंडल यांच्या मत्स्यशेतीतील सर्वात मोठी समस्या हि माश्यांची मर मोठ्या प्रमाणात होणे हि होती त्यामुळे त्यांचा अँटिबायोटिक व रासायनिक औषधांवरचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला . यापूर्वी मिळणारे मत्स्यउत्पादन आणि बायोफिट वापरानंतर मिळणारे उत्पादन यामध्ये जहीर मंडल यांना समाधानकारक यश मिळाले आहे.