logo
back-arrow
श्री. भगवान ज्ञानू करांडे
सोलापूर, महाराष्ट्र.
 
एकूण क्षेत्र: बागायती 7 एकर, जिरायती 3 एकर
display-image
श्री. भगवान करांडे हे शेती एका पारंपारीक पध्दतीने न करता, व्यावसायिक दृष्टिकोनातून नवनवीन प्रयोगांसहित करत असतात.

त्यांच्याकडे घेवडा (वाल) पिकासाठी जवळपास दिड ते दोन एकर क्षेत्र असते. दरवर्षी रब्बी हंगामा मध्ये ते घेवडा पिकाची टोकण पध्दतीने पेरणी करतात. पेरणी नंतर 40-45 दिवसांनी त्यांना पहिला तोडा मिळतो. पिकाची वाढ, शाखिय विकास, फुटवे आणि फुलकळीची संख्या यावरती त्यांचे पीक जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत उत्पादन देते. या दरम्यान त्यांना नागअळी, फळ पोखरणारी अळी व मावा अश्या किडींचा बंदोबस्त करावा लागतो. त्यामुळे त्यांचा रासायनिक खते, मशागत आणि मजूर या सर्वांवर खूप जास्त खर्च होतो.
चालू हंगामामध्ये श्री. करांडे यांनी घेवड्याच्या एआरडीएल-183 वाणाची निवड केली आणि टोकण पध्दतीने पेरणी केली. घेवडा पिकासाठी आवश्यक असणारी सर्व मशागत, खते, भरखते यांचा त्यांनी योग्य पध्दतीने वापर केला. त्याचबरोबर पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये बायोफिट स्टिमरिच, बायो-99 व शेत याच्या 15-20 दिवसांच्या अंतराने फवारणी घेतली. त्यामुळे पिकाची वाढ चांगली मिळाली. तसेच फुलकळी जास्त प्रमाणात मिळाली. नैसर्गिकरित्या होणारी फुलगळ कमी झाली. पिकावर येणार्‍या रसशोषक किडींच्या प्रतिबंधात्मक उपायासाठी त्यांनी बायोफिट इन्टॅक्ट व बायो-99 याच्या 15 दिवसांच्या अंतराने 4 वेळा फवारणी केली. त्यामुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी झाला.
पुर्वीचे घेवडा पीक व बायोफिट घेवडा पिकामधील फरक
पुर्वीचे घेवडा पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु.1,20,000
  • सरासरी उत्पादन टन/एकरः 18 टन
  • बाजारभाव/क्विंटलः रु.2500 क्विं
  • एकूण उत्पादनः रु.4,50,000
  • निव्वळ नफा/एकरः रु.3,30,000
बायोफिट घेवडा पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु. 1,00,000
  • सरासरी उत्पादन टन/एकरः 23 टन
  • बाजारभाव/क्विंटलः रु.2900 क्विं
  • एकूण उत्पादनः रु.6,67,000
  • निव्वळ नफा/एकरः रु.5,67,000
चालू रब्बी हंगामामध्ये करांडे यांना सरासरी 22 ते 23 टन उत्पादन मिळाले तसेच उत्पादन खर्च सुध्दा कमी झाला.