logo
back-arrow
श्री. देवराज
दावणगिरी, कर्नाटक .
 
एकूण क्षेत्र/एकरः 8 बागायती
display-image
देवराज हे एक प्रगतीशील शेतकरी असून व्यवसायाभिमुख शेती करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांच्याकडे 8 एकर क्षेत्रामध्ये डाळींबाची (जात-भगवा) बाग आहे. दरवर्षी ते ऑक्टोबर महिन्यामध्ये बहार पकडतात आणि सर्वसाधारण मार्च महिन्यामध्ये डाळींब फळाची काढणी केली जाते.
7 वर्षांपूर्वी देवराज यांनी डाळींब पिकाच्या रोपांची लागण केली होती. साधारणपणे रोप लागणीनंतर तिसर्‍या वर्षी त्यांनी डाळींब पीक फळ घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या 3-4 वर्षांमध्ये त्यातून 3.5 ते 4 टन प्रति एकर उत्पादन मिळाले. मागील वर्षीच्या हंगामामध्ये त्यांची बाग 7 वर्षांची झाली. त्या वर्षी त्यांना एकरी 6 टन डाळींब उत्पादन मिळाले. उत्पादन घेत असताना रोग व किड नियंत्रण करण्यासाठी देवराज यांचा बराच वेळ व भांडवल खर्च होत असे. चालू हंगामाच्या सुरुवातीपासून देवराज यांनी बायोफिट उत्पादनांचा वापर त्यांनी पिकासाठी केला होता. त्यांनी सुरुवातीस बायोफिट एन.पी.के. व बायोफिट शेत 1 लि. प्रति एकर क्षेत्रासाठी ठिबक सिंचनाद्वारे वापरले. तसेच बायोफिट स्टिमरिच व बायो-99 च्या 20-25 दिवसांच्या अंतराने फवारणी घेतल्या. त्यामुळे चालू हंगामामध्ये त्यांना डाळिंब पिकामध्ये कमालीचा बदल पहायला मिळाला. डाळींब पिकाची वाढ सुयोग्य झाली, फुलगळ कमी झाली, परिणामी फळधारणा चांगली झाली. त्यांना सर्वसाधारण 400-500 ग्रॅम वजनाची फळे मिळाली.

डाळींब पिकावर रसशोषक किड, बुरशीजन्य रोग येवू नयेत म्हणून त्यांनी बायोफिट इंटॅक्ट व रॅपअपच्या 15-20 दिवसांच्या अंतराने वेगवेगळ्या फवारण्या घेतल्या.
पुर्वीचे डाळींब पीक व बायोफिट डाळींब पिकामधील फरक
पुर्वीचे डाळींब पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु.1,30,000
  • सरासरी उत्पादन/एकरः 6 टन
  • बाजारभाव/क्विंः रु.5,000
  • एकूण उत्पन्नः रु.3,00,000
  • निव्वळ नफा/एकरः रु.1,70,000
बायोफिट डाळींब पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु. 1,60,000
  • सरासरी उत्पादन/एकरः 8.5 टन
  • बाजारभाव/क्विंः रु.5,500
  • एकूण उत्पन्नः रु.4,67,500
  • निव्वळ नफा/एकरः रु.3,07,500
चालू वर्षी त्यांना जवळपास 8.5 टन माल प्रति एकर मिळाला. तसेच डाळींब फळांचे वजन चांगले मिळाले.