logo
back-arrow
श्री. रामा अमृत भिगवडे
नागपूर, महाराष्ट्र.
 

display-image
रामा भिगवडे प्रामुख्याने फळभाज्या व भाजीपाल्याचे पीक घेतात. शेती मध्ये नवनवीन कृषी तंत्रज्ञान, सुधारीत अवजारे व संकरीत बियाणे यांचा ते वापर करतात.

मिरचीचे उत्पादन घेत असताना त्यांना अनेक अडचणींवर मात करावी लागते. जसे की उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवणे व उत्पन्न वाढवणे. मिरची उत्पादना दरम्यान त्यांचा बराचसा खर्च पिकावरील रोग व कीड व्यवस्थापनावर होत असे.

चालू रब्बी हंगामाच्या सुरुवातीला श्री. भिगवाडे यांनी मिरचीच्या (संकरीत वाण-ए.जी.एस.-ए.के.47) याच्या रोपांची लागण केली. त्यानंतर 10 दिवसांनी त्यांनी बायोफिट एन.पी.के. व शेत प्रत्येकी 1 लि. प्रमाणे 200 लि. पाण्यामध्ये मिसळून ते द्रावण ठिबक सिंचनाद्वारे 1 एकर क्षेत्रासाठी दिले. तसेच दुसरा डोस 25 दिवसांच्या अंतराने दिला. त्यामुळे जमिनीमधील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढली. जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली.

तसेच बायोफिट स्टिमरिच व बायो-99 च्या 20 दिवसांच्या अंतराने फवारण्या घेतल्या. त्यामुळे त्यांना पिकाची वाढ, नवीन फुटव्यांची संख्या व फुलकळीचे योग्य प्रमाण मिळाले. तसेच झाडाची वातावणामधील बदल, कीड व रोगांचा प्रतिरोध करण्याची शक्ती वाढली.
पुर्वीचे मिरची पीक व बायोफिट मिरची पिकामधील फरक
पुर्वीचे मिरची पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु.95,000
  • सरासरी उत्पादन क्विं/एकरः 90 क्विं
  • बाजारभाव/क्विंटलः रु.1800 क्विं
  • एकूण उत्पादन/एकरः रु.1,62,000
  • निव्वळ नफा/एकरः रु.67,000
बायोफिट मिरची पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु. 1,20,000
  • सरासरी उत्पादन क्विं/एकरः 115 क्विं
  • बाजारभाव/क्विंटलः रु.3800 क्विं
  • एकूण उत्पादन/एकरः रु.4,37,000
  • निव्वळ नफा/एकरः रु.3,17,000
पिकावर येणार्‍या रसशोषक कीड व बुरशीजन्य तसेच जीवाणूजन्य रोगांच्या प्रतिबंधात्मक उपायासाठी त्यांनी बायोफिट इन्टॅक्ट आणि रॅपअपच्या 15-20 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारण्या घेतल्या. त्यामुळे त्यांचा रासायनिक औषधावरील खर्च कमी झाला. चालू वर्षी त्यांच्या मिरचीच्या उत्पादनात वाढ झाली. तसेच मालाचा दर्जा सुधारला.