logo
back-arrow
श्री. रविंद्र मच्छिंद्र गव्हाणे
अहमदनगर, महाराष्ट्र.
 
एकूण क्षेत्र/एकरः 6 बागायती
display-image
रविंद्र गव्हाणे हे एक युवा शेतकरी असून बाजारपेठेचा व बाजारभावांचा योग्य अभ्यास करुन शेती करतात. मागील खरीप हंगामाच्या 15 दिवस अगोदर त्यांनी 2 एकर क्षेत्रामध्ये केळी (जी-9) जातीचे टिशुकल्चर रोपांची लागवड केली. एकूण 2 एकर क्षेत्रामध्ये त्यांची 2700 केळी रोपांची लागवड झाली. केळीसाठी लागणारी आवश्यक अन्नद्रव्ये त्यांनी ठिबक सिंचनाद्वारे प्रत्येक महिन्यामध्ये दिली. पिकावर येणारे रोग व किडीसाठी त्यांनी योग्य ती उपाय योजना केली. त्यांना 1 एकर केळी पीक घेण्यासाठी सरासरी 1 लाख 70 हजार रु. इतका खर्च आला व त्या वर्षी केळ्यांना 12,000 प्रति टन इतका भाव मिळाला.

चालू हंगामामध्ये रविंद्र गव्हाणे यांनी केळी खेडवा पिकासाठी बायोफिट उत्पादनांचा वापर केला. सुरुवातीपासून त्यांनी बायोफिट शेत व बायोफिट एन.पी.के. यांचा प्रत्येकी 1 लि. प्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये 1 असा 5 वेळा वापर केला. त्यामुळे जमिनीमधील असलेल्या अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढली. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले आणि जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली. बायोफिट एन.पी.के व बायोफिट शेत च्या वापरामुळे रासायनिक खतांच्या खर्चामध्ये 30% बचत झाली. पिकाच्या सुयोग्य वाढीसाठी त्यांनी बायोफिट स्टिमरिच व बायो-99 ची 20 ते 25 दिवसांच्या अंतराने फवारणी केली. तसेच केळी पिकावर येणार्‍या रोगांपासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांनी बायोफिट रॅपअपच्या 20 दिवसांच्या अंतराने फवारण्या घेतल्या.
पुर्वीचे केळीचे पीक व बायोफिट केळी पिकामधील फरक
पुर्वीचे केळी पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु.1,70,000
  • सरासरी उत्पादन/एकरः 36 टन
  • बाजारभाव/टनः रु.12,000 टन
  • एकूण उत्पान्न/एकरः रु.4,32,000
  • निव्वळ नफा/एकरः रु.2,62,000
बायोफिट केळी पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु. 1,40,000
  • सरासरी उत्पादन/एकरः 42 टन
  • बाजारभाव/क्विंटलः रु.13,500 टन
  • एकूण उत्पन्न/एकरः रु.5,67,000
  • निव्वळ नफा/एकरः रु.4,27,000
परिणामतः, चालू हंगामामध्ये त्यांना केळी पिकामध्ये कमालीचा बदल पहायला मिळाला. केळीच्या घडांची वाढ चांगली झाली. त्यांना प्रत्येक घडात 10 ते 12 फण्या मिळाल्या. तसेच त्यांना प्रत्येक घडामागे 35 ते 40 किलो वजन मिळाले.