logo
back-arrow
श्री. सुरेश बबन भोसले
सातारा, महाराष्ट्र.
display-image
सुरेश भोसले हे शेती सोबत जोडव्यवसाय म्हणून 2005 पासून बंदिस्त शेळी पालन करत आहेत. त्यासाठी आवश्यक अशी सर्व व्यवस्था भोसले यांनी केली आहे. त्यांच्या शेळीपालनामध्ये सिरोही जातीच्या 2 आणि बिटल जातीच्या 12 अश्या 14 शेळ्या आणि बिटल जातीचे 7 बोकड आहेत.

शेळ्यांचे पालन पोषण सुधारण्यासाठी ते शेतावर काही द्वीदल चारा पीके घेतात. तसेच द्वीदल धान्यापासून ते घरीच भरडा देखील तयार करतात.

शेळी पालनामध्ये शेळ्यांचे आरोग्य, सकस आहार, शुध्द पाणी, पावसाळ्यामध्ये रोगांपासून होणारे आजार व त्यावरील उपचार, शेळी व्याल्यानंतर तिच्या पिल्लांचे बुळकांडीमुळे होणारे मृत्यू इत्यादी गोष्टींवर खूप बारकाईने लक्ष ठेवावे लागते.

साधारणपणे दरवर्षी एक शेळी दोन वेळा पिल्ले देते. त्यातून त्यांना 5 ते 6 पिल्ले मिळतात. सहा महिन्यांमध्ये पिल्लांची योग्य वाढ होऊन साधारण 25 ते 27 किलो वजन भरते. एका शेळी पिल्लासाठी 6 महिन्यांमध्ये त्यांना रु.2000 ते 2500 खर्च येतो.
पुर्वीचे शेळीपालन व बायोफिट शेळीपालन यामधील फरक
पुर्वीचे शेळीपालन (20 शेळी) :
  • शेळीपालन संगोपन खर्चः रु.45,000
  • उत्पादन विक्रीयोग्य बोकडः 9
  • सरासरी वजन/बोकडः 25 कि.
  • जिवंत बोकड बाजारभावः रु. 275/कि.
  • एकूण बोकडाचे उत्पादनः 225 कि.
  • एकूण उत्पन्नः रु.61,875
  • निव्वळ नफा/6-8 महिनेः रु.16,875
बायोफिट शेळीपालन (20 शेळी) :
  • शेळीपालन संगोपन खर्चः रु.48,000
  • उत्पादन विक्रीयोग्य बोकडः 10
  • सरासरी वजन/बोकडः 32 कि.
  • जिवंत बोकड बाजारभावः रु. 300/कि.
  • एकूण बोकडाचे उत्पादनः 320 कि.
  • एकूण उत्पन्नः रु.96000
  • निव्वळ नफा/6-8 महिनेः रु.48,000
सुरेश भोसले यांनी मागच्या 8 ते 10 महिन्यापासून बायोफिट सी.एफ.सी. प्लसचा वापर सुरु केला. दररोजच्या खाण्यामध्ये प्रत्येक शेळीसाठी त्यांनी 5 ग्रॅम सी.एफ.सी. प्लस देण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेळीच्या पिल्लांची वाढ सुयोग्य झाली. एफ.सी.आर. दर वाढला, पावसाळ्यामध्ये होणार्‍या आजारांपासून त्यांचे संरक्षण चांगले झाले, वजन वाढण्यास मदत झाली, बोकडाचा चपळपणा वाढला. सी.एफ.सी. प्लसमुळे श्री. भोसले यांना 1 पिल्लू जास्त मिळाला व त्यांना 6-8 महिन्यांमध्ये तिप्पट नफा कमावता आला.