logo
back-arrow
श्री. सावित्रीभाऊ रखमाजी थोरात,
अहमदनगर, महाराष्ट्र .
 
पिकाचा प्रकार : मका
एकूण शेती/बागायती क्षेत्र : 77 एकर
display-image
सावित्रीभाऊ रखमाजी थोरात यांची एक प्रगतीशील शेतकरी म्हणून पंचक्रोशीमध्ये ओळख आहे. शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, संकरीत वाण पिकामधील फेरपालट यावर त्यांचेबारकाईने लक्ष असते. थोरात गेल्या कित्येक वर्षापासून मका पीक घेत आले आहेत. दरवर्षी त्यांचे जवळपास 18 ते 20 क्षेत्र हे मका पिकाखाली असते.
पण मका पीक व्यवस्थापन करत असताना त्यांना लष्करी अळी या किडीचा प्रादुर्भाव बर्‍याच वेळेला येत होता. अतिपाऊस झाल्यानंतर मका पिकाची वाढ खुंटत होती. त्याचा परिणाम उत्पादनावर होत होता.

थोरात यांना चालू हंगामामध्ये मका पिकासाठी बायोफिट उत्पादनांचा वापर केला. बायोफिट स्टिमरिच, बायो-99 यांची प्रत्येकी 15 ते 20 दिवसांच्या अंतराने 2 वेळा फवारणी घेतली. त्यामुळे मका पिकाची वाढ जोमाने झाली. दोन पेरांमधील अंतर वाढले.
त्यांनी बायोफिट इन्टॅक्ट व बायो-99 ची फवारणी प्रत्येकी 20 दिवसांच्या अंतराने 3 वेळा केली. त्यामुळे रसशोषण किटकांचा प्रादुर्भाव कमी झाला.
बायोफिट एन.पी.के. आणि बायोफिट शेत 1 लि. प्रत्येकी असे द्रावण त्यांनी पाटपाण्याच्या द्वारे 2 वेळा महिन्याच्या अंतराने दिले. त्याचा फायदा त्यांना उत्पादन वाढीसाठी झाला.
पूर्वी घेत असलेले मका पिक आणि बायोफिट मका पिक यांमधील फरक
पूर्वीची मका शेती:
  • उत्पादन खर्च 1 एकर साठीः रु. 18 हजार
  • एकुण उत्पादन 1 एकरः 2.25 टन
  • बाजारभावः रु. 1100 प्रति क्विंटल
  • एकुण उत्पादन रु.: 4 लाख 95 हजार
  • निव्वळ नफा 20 एकरः रु. 1 लाख 35 हजार
बायोफिट मकाशेती (चालू वर्ष):
  • उत्पादन खर्च 1 एकर साठीः रु. 17 हजार
  • एकुण उत्पादन 1 एकरः 3 टन
  • बाजारभावः रु. 1100 प्रति क्विंटल
  • एकुण उत्पादन रु.: 6 लाख 60 हजार
  • निव्वळ नफा 20 एकरः रु. 3 लाख 20 हजार
चालू खरीप हंगामामध्ये त्यांना मका पिकामध्ये खूप चांगला अनुभव बदल पहायला मिळाला. मका कणसाची लांबी सरासरी 9 इंच झाली आहे. तसेच मका दाणे टपोरे भरलेले आहेत. काही मक्यांवर त्यांना दोन कणसे मिळाली आहेत. त्यांना बायोफिट उत्पादनांचा चांगला फायदा झाला. त्यांना चालू वर्षी प्रती एकर सरासरी 2.5 ते 2.75 टन उत्पादनाची अपेक्षा आहे. त्यांच्या अंदाजानुसार चालू वर्षी त्यांना 20 एकर क्षेत्रामधुन 56 टन मक्याचे उत्पादन मिळेल याची खात्री आहे.