logo
back-arrow
श्री. अमोल सखाराम गोसावी,
पंढरपूर, महाराष्ट्र.
 
पिकाचा प्रकार : केळी
एकूण शेती/बागायती क्षेत्र : १.५ एकर
display-image
पंढरपूरात 2009 पासून शेती करणार्‍या अमोल सखाराम गोसावी यांच्याकडे असलेल्या 7 एकर जमिनीमध्ये ते सुरुवातीस ऊस पिक घेत असत. परंतू दर पिकामागे 3 वर्षे, भरपूर रासायनिक खते आणि पाटाचे पाणी खर्ची घालूनही त्यांना ऊसाचे कमी उत्पादन मिळत होते.
नोव्हेंबर 2019 मध्ये अमोल यांनी 1.5 एकर क्षेत्रामध्ये केळीच्या जी-9 जातीच्या एकूण 1800 रोपांची लागण केली. नंतर त्यांनी बायोफिट एन.पी.के. आणि बायोफिट शेत 1 लि. प्रत्येकी एका एकरासाठी असे 6 डोस त्यांनी 25 दिवसांच्या अंतराने दिले. त्यामुळे त्यांचा रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी झाला, जमिनीमधील सैंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत झाली. अमोल यांनी केळी पिकावर येणार्‍या बुरशीजन्य रोगांचा अटकाव करण्यासाठी बायोफिट रॅपअपची फवारणी दर महिन्याला घेतली. केळीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये त्यांनी बायोफिट स्टीमरीच, बायो-99 व बायोफिट शेत यांची 4 वेळा 15 ते 20 दिवसांच्या अंतराने फवारणी घेतली. तसेच बायोफिट इन्टॅक्टचा वापर रसशोषण किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी केला.
बायोफिट केळीचे पीक
  • उत्पादन खर्च प्रति एकर : रु. 95 हजार
  • एकूण उत्पादन प्रति एकर : 32 टन
  • बाजारभावः रु. 8,600 प्रती टन (रु. 2 लाख 75 हजार प्रती एकर)
  • निव्वळ नफा प्रति एकर : रु.1 लाख 80 हजार
  • जमिनीची प्रतवारी मधील बदल : जमिनीचा पोत सुधारला
पूर्ण पिकाच्या कार्यकालामध्ये वादळी पावसामुळे त्यांच्या 200 झाडांचे नुकसान झाले. पण उर्वरीत केळीच्या झाडांना प्रत्येकी 14 ते 16 फण्या मिळाल्या. सरासरी त्यांना 40 ते 45 किलो वजनाचा घड एका झाडापासून मिळाला. त्यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये केळीचे संपूर्ण पीक घेतले. त्यामध्ये त्यांना एकूण 1.5 एकर क्षेत्रामध्ये 49 टन उत्पादन मिळाले. बाजार भावानुसार त्यांना त्याचे उत्पन्न रु. 4 लाख 21 हजार रुपये मिळाले.