logo
back-arrow
श्री. अशोक मोरे
परभणी, महाराष्ट्र.
 
पिकाचा प्रकार : कापूस
एकूण क्षेत्र : 4 एकर
display-image
पिंपळगाव मधील अशोक वसंतराव मोरे हे प्रत्येक वर्षी शेतामध्ये ते वेगवेगळी खरीप व रब्बी हंगामातील पीके घेत असतात. ते प्रत्येक वर्षी 3.5 ते 4 एकर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करतात. कापूस पिकाची लागवड करत असताना ते कोरडवाहू शेतीसाठी योग्य असणार्‍या एन.एच.545 जातीच्या बियाणाची निवड प्रत्येक वर्षी करत आहेत. पीक घेत असताना कापूस पिकामध्ये येणारे रोग व कीड यांमुळे त्यांचे बरेच नुकसान होत होते. त्याचप्रमाणे कोरडवाहू शेती असल्यामुळे त्यांना पाण्याचे नियोजन पूर्ण क्षमतेने करावे लागते कारण कमी पाणी अथवा अतीवृष्टी या दोन्हीमुळे पिकाच्या वाढीवर परिणाम होतो.
अशोक मोरे यांनी गेल्या खरीप हंगामामध्ये कापूस पीक लागवड करत असताना बायोफिटची उत्पादने सुरुवातीपासून वापरली. बायोफिट स्टिमरिच, बायो-99 च्या कापूस पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये 3 वेळा फवारण्या घेतल्या. त्यामुळे कापूस पिकाची वाढ सुयोग्य झाली. पाण्याच्या कमतरतेमुळे पिकावर जो ताण येत होता त्या अवस्थेमध्ये सुध्दा पीक टवटवीत व सशक्त होते. पिकावर येणार्‍या अनैसर्गिक ताणामध्ये जी फुलगळ होत होती त्याचे प्रमाण कमी झाले. बायोफिट एन.पी.के. व बायोफिट शेत यांचा जमिनीमध्ये त्यांनी सुरुवातीच्या महिन्यामध्ये वापर केला. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली. तसेच त्यांचा रासायनिक खतांवरील खर्च इतरांच्या तुलनेमध्ये कमी झाला.
पूर्वीची कापसाची शेती आणि बायोफिट कापसाची शेती यांमधील फरक-
पूर्वीची कापूस शेती:
  • उत्पादन खर्च प्रति एकरः रु. 20,000
  • सरासरी उत्पादन प्रति एकरः 8 क्विंटल
  • बाजारभाव प्रति क्विंटलः रु 5,500
  • एकूण उत्पादन प्रति एकरः रु 44,000
  • निव्वळ नफा प्रति 1 एकरः रु 24,000
बायोफिट कापूस शेती:
  • उत्पादन खर्च प्रति एकरः रु. 24,000
  • सरासरी उत्पादन प्रति एकरः 11 क्विंटल
  • बाजारभाव प्रति क्विंटलः रु 5,600
  • एकूण उत्पादन प्रति एकरः रु 61,600
  • निव्वळ नफा प्रति 1 एकरः रु 37,600
रसशोषक किडी येऊ नयेत याकरीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांनी बायोफिट इन्टॅक्टच्या 2 वेळा फवारण्या घेतल्या, त्यामुळे इतर शेतकर्‍यांच्या तुलनेमध्ये त्यांच्या कापूस पिकामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी दिसून आला.