logo
back-arrow
श्री. दत्तात्रय नामदेव कुंजीर
पुणे, महाराष्ट्र.
 
एकूण क्षेत्र: 4 एकर बागायती
display-image
दत्तात्रय नामदेव कुंजीर गेल्या 20 वर्षांपासून फळभाज्या व भाजीपाला पिकांची शेती करत आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव व कोणत्या हंगामाध्ये कोणता भाजीपाला, फळभाज्यांची आवक होते. या सर्व गोष्टींचा ते नेहमी अभ्यास करत असतात.

कुंजीर यांनी चालू रब्बी हंगामामध्ये 1 एकर क्षेत्रावर कोबीच्या रोपांची लागण केली. परंतू कोबीवर रोप अवस्थेपासून ते काढणीपर्यंत जीवाणूजन्य व बुरशीजन्य रोग उदा. करपा, भुरी, काळे ठिपके, रोप मर असे बरेच रोग येत असत. तसेच वेगवेगळ्या रस शोषक किडी व पाने खाणारी अळी यांचा खूप प्रादुर्भाव होत असे. त्यांचे रासायनिक औषधांवर बरेच पैसे व कष्ट वाया जात होते. रसायनांच्या अति वापरामुळे पिकाची प्रतिरोध क्षमता कमी होऊन जमिनीचा पोत कमी होत असे.

कुंजीर यांनी रोप लागण झाल्यानंतर 8-10 दिवसांनी बायोफिट एन.पी.के आणि बायोफिट शेत 1 लि. प्रत्येकी 200 लि. पाण्यामध्ये मिसळून 2 वेळा 20 दिवसांच्या अंतराने ठिबक सिंचनाद्वारे दिले. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारला व अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढली, रासायनिक खतांचा खर्च 20% कमी झाला. त्यांनी बायोफिट रॅपअपच्या 15 दिवसांच्या अंतराने 4 वेळा फवारण्या घेतल्या. त्यामुळे पिकावर येणारे बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला. तसेच त्यांनी बायोफिट इन्टॅक्टच्या 20-25 दिवसांच्या अंतराने फवारण्या घेतल्या त्यामुळे कुंजीर यांचा रासायनिक बुरशीनाशक व किडनाशकांवरचा खर्च कमी झाला. पिकाची सुयोग्य वाढ, गड्डयांचा आकार वाढण्यासाठी कुंजीर यांनी पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये बायोफिट स्टीमरिच व बायो-99 च्या 15-20 दिवसाच्या अंतराने फवारण्या घेतल्या.
पुर्वीचे कोबी पीक व बायोफिट कोबी पिकामधील फरक
पुर्वीचे कोबी पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु.60,000
  • सरासरी उत्पादन क्विं/एकरः 130 क्विं
  • बाजारभाव/क्विंटलः रु.700 क्विं
  • एकूण उत्पादन/एकरः रु.91,000
  • निव्वळ नफा/एकरः रु.31,000
बायोफिट कोबी पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु. 55,000
  • सरासरी उत्पादन क्विं/एकरः 160 क्विं
  • बाजारभाव/क्विंटलः रु.850 क्विं
  • एकूण उत्पादन/एकरः रु.1,36,000
  • निव्वळ नफा/एकरः रु.81,000
त्यामुळे चालू वर्षी श्री. कुंजीर यांना कोबीच्या पिकातून दुप्पट नफा मिळाला.