logo
back-arrow
श्री. हरिशचंद्र दसाराम टेकाम
भंडारा, महाराष्ट्र.
 

display-image
हरिशचंद्र दसाराम टेकाम हे पारंपारिक शेती करत असताना कमीतकमी रासायनिक खते व औषधे वापरुन, किफायती शेती करण्याकरिता प्रयत्नशील असतात. त्यांच्याकडे भात हे प्रमुख अन्नधान्य पीक घेतले जाते. भात पिकावर येणारी किड व रोग यांच्या व्यवस्थापनावर त्यांचा बराच खर्च होत असे. टेकाम हे भात पीक रोप लागण पध्दतीने करतात. ते भात पिकासाठी आवश्यक खते ही शेत-जमिन चिखलणी करताना वापरतात.

चालू वर्षी उन्हाळी भात पीक घेत असताना हरिशचंद्र टेकाम यांनी भात-1009 कार वाणाची निवड केली. लावणी करण्याअगोदर चिखलणी करतेवेळी त्यांनी प्रति एकरी 1 लि. बायोफिट एन.पी.के आणि बायोफिट शेत अशा जीवाणूयुक्त खतांचा वापर केला. त्यानंतर 30 दिवसांच्या अंतराने त्यांनी बायोफिट एन.पी.के व बायोफिट शेत प्रत्येकी 1 लि. प्रमाणे 1 एकर क्षेत्रासाठी पाटपाण्याच्या माध्यमातून दिले. त्यामुळे भात पिकाची जोमाने वाढ झाली. तसेच रासायनिक खतांवरील अतिरिक्त खर्च टळला.

भात पिकाची सुयोग्य वाढ होण्यासाठी त्यांनी नर्सरी बेड (रोपवाटीका) मधील भात रोपांवर बायोफिट स्टिमरिच, बायो-99 व बायोफिट शेत यांची फवारणी केली. त्यामुळे भाताचे रोप 1 आठवडा अगोदर लागणी करिता तयार झाले.
पुर्वीचे भात पीक व बायोफिट भात पिकामधील फरक
पुर्वीचे भात पीक:
  • उत्पादन खर्च/एकरः रु.20,000
  • सरासरी उत्पादन/एकरः 19 क्विंटल
  • बाजारभाव/क्विंः रु. 1300
  • एकूण उत्पन्न/एकरः रु. 24,700
  • निव्वळ नफा/एकरः रु. 4700
बायोफिट भात पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु. 26,000
  • सरासरी उत्पादन/एकरः 28 क्विंटल
  • बाजारभाव/क्विंः रु. 1500
  • एकूण उत्पन्न/एकरः रु. 42,000
  • निव्वळ नफा/एकरः रु. 16,000
रोप लागणी नंतर त्यांनी पुन्हा 20 दिवसांच्या अंतराने बायोफिट स्टिमरिच, बायो-99 व बायोफिट शेत यांच्या मिश्र पध्दतीने 2 फवारण्या घेतल्या. त्यामुळे चालूू हंगामामध्ये भाताच्या पिकाची वाढ सुयोग्य झाली.