logo
back-arrow
श्री. माधव गणेशराव लोमटे
नांदेड, महाराष्ट्र.
 
एकूण क्षेत्र: बागायती - 8 एकर
display-image
माधव गणेशराव लोमटे शेतीमध्ये वेगवेगळी नगदी पिके घेतात. श्री. लोमटे हे प्रत्येक वर्षी खरबूज पीक रब्बी हंगामामध्ये घेतात. साधारण ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला खरबूज पिकांची रोप लागण ते मल्चिंग पेपर वर करतात. पाण्याचे योग्य नियोजन, तण व्यवस्थापन, मालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांना मल्चिंग आच्छादनाचा खूप फायदा होतो. पिकांवर पानांवरील ठिपके, भुरी, डाऊनी, करपा सारखे रोग आणि मावा, तुडतुडे, बिटल सारख्या किडीचा प्रादुर्भाव होत असे. रासायनिक खते, रोग व कीड व्यवस्थापन यावर त्यांचा बराच वेळ आणि पैसा खर्च होत असे.

चालू वर्षी खरबूज पीक घेत असताना लोमटे यांनी सुरुवातीपासून बायोफिट उत्पादनांचा वापर केला. खरबूज-कुंदन आणि मृदुला अश्या दोन वाणांची निवड त्यांनी केली होती.
खरबूज पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये त्यांनी बायोफिट स्टिमरिच व बायो-99 ची 15-20 दिवसांच्या अंतराने फवारणी केली. त्यामुळे पिकाची वाढ सुयोग्य झाली. फळांचा आकार वाढला. खरबूजाची रोप लागवड करताना आणि लागवडीनंतर 25 दिवसांनी त्यांनी एक एकरामध्ये बायोफिट एन.पी.के व शेत प्रत्येकी 1 लि. हे 200 लि. पाण्यामध्ये मिश्रण करुन ठिबक सिंचनाद्वारे जमिनीमध्ये सोडले. त्यामुळे फळाची वाढ चांगली होऊन जमिनीचा पोत सुधारला. रोग व कीड यांच्या प्रतिबंधात्मक उपायासाठी त्यांनी बायोफिट रॅपअप व इन्टॅक्टच्या 20-21 दिवसांच्या अंतराने वेगवेगळ्या फवारण्या घेतल्या. त्यामुळे चालू वर्षी रोग व किडीचा मागील वर्षाच्या तुलनेमध्ये प्रादुर्भाव कमी झाला.
पुर्वीचे खरबूज पीक व बायोफिट खरबूज पिकामधील फरक
पुर्वीचे खरबूज पीक :
  • उत्पादन खर्चः रु.75,000
  • सरासरी उत्पादन क्विं/एकरः 65 क्विं.
  • फळाचे सरासरी वजनः 700 ग्रॅ
  • बाजारभावः रु. 16/किलो
  • एकूण उत्पादन/एकरः रु.1,04,000
  • निव्वळ नफा/एकरः रु.29,000
बायोफिट खरबूज पीक :
  • उत्पादन खर्चः रु.85,000
  • सरासरी उत्पादन क्विं/एकरः 78 क्विं.
  • फळाचे सरासरी वजनः 800 ग्रॅ
  • बाजारभावः रु. 19/किलो
  • एकूण उत्पादन/एकरः रु.1,48,200
  • निव्वळ नफा/एकरः रु.63,200
बायोफिट उत्पादनांच्या वापरामुळे या वर्षी पिकामध्ये त्यांना कमालीचा सकारात्मक अनुभव मिळाला.