logo
back-arrow
श्री. नितीन विष्णू मोकाशी
पालघर, महाराष्ट्र.
 
एकूण क्षेत्र: 5 एकर बागायती
display-image
नितीन विष्णू मोकाशी हे पदवीधर शेतकरी असून ते गेल्या 3-4 वर्षांपासून कलिंगडाचे पीक घेत आहेत. यासाठी अनुकूल निचर्‍याची शेतीजमीन त्यांच्याकडे आहे. ते नोव्हेंबर महिन्यामध्ये कलिंगड बियाण्याची टोकण पध्दतीने प्लास्टिक मल्चिंग पेपरवर लागवड करतात. कलिंगडाचे पीक घेत असताना त्यावर येणारे करपा, रोप मर आणि भुरी सारखे रोग व मावा, फुलकिडे, तुडतुडे इत्यादी किडीच्या नियंत्रणासाठी त्यांना वेगवेगळ्या रासायनिक औषधांचा वापर करावा लागत असे. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च वाढत होता.

मोकाशी यांनी चालु रब्बी हंगामामध्ये 5 एकर क्षेत्रावर कलिंगड (वाण-गोल्डन 786) पिकाची लागवड केली. कलिंगड टोकणीनंतर 12-15 दिवसांनी त्यांनी बायोफिट स्टिमरिच व बायो-99 ची पहिली फवारणी घेतली. त्यानंतर त्यांची 20 दिवसांच्या अंतराने त्यांनी पुन्हा 3 वेळा फवारणी घेतली. त्यामुळे पिकाची सुयोग्य वाढ झाली, फुलकळीची संख्या चांगली मिळाली. कलिंगड फळांचा आकार वाढला. तसेच नोव्हेंबर व डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांनी बायोफिट एन.पी.के. व शेत 1 लि. प्रत्येकी 200 लि. पाण्यासोबत 1 एकर क्षेत्रासाठी ठिबक सिंचनाद्वारे वापरले. त्यामुळे खते व जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढली आणि उत्पादनामध्ये वाढ झाली.

कलिंगड पिकावर बुरशीजन्य रोग येवू नयेत याकरिता त्यांनी बायोफिट रॅपअपचा वापर केला. तसेच रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता त्यांनी बायोफिट इन्टॅक्टचा वापर केला. बायोफिट रॅपअप व इन्टॅक्टमुळे रासायनिक औषधांवरील खर्च कमी झाला.
पुर्वीचे कलिंगड पीक व बायोफिट कलिंगड पिकामधील फरक
पुर्वीचे कलिंगड पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु.55,000
  • सरासरी उत्पादन/एकरः 80 क्विं
  • फळाचे सरासरी वजनः 2.5 ते 3 कि.
  • बाजारभाव/क्विंटलः रु.1000 क्विं
  • एकूण उत्पादन/एकरः रु.80,000
  • निव्वळ नफा/एकरः रु.25,000
बायोफिट कलिंगड पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु. 60,000
  • सरासरी उत्पादन/एकरः 95 क्विं
  • फळाचे सरासरी वजनः 3 ते 4 कि.
  • बाजारभाव/क्विंटलः रु.1150 क्विं
  • एकूण उत्पादन/एकरः रु.1,09,250
  • निव्वळ नफा/एकरः रु.49,250
चालू हंगाममध्ये बायोफिट उत्पादनांच्या वापरामुळे फळांचा आकार वाढला, रंग गर्द हिरवा झाला, फळांची गोडी वाढली.