logo
back-arrow
श्री. परमेश्वर यादवराव काकडे
जालना, महाराष्ट्र.
 
एकूण क्षेत्र/एकरः 8 बागायती
display-image
परमेश्वर काकडे दरवर्षी सोयाबीनचे पीक घेत आहेत. पारंपारीक पध्दतीने शेती करत असताना संकरीत वाण आणि खतांचे योग्य नियोजन याकडे ते प्रामुख्याने लक्ष देत असतात. दरवर्षी त्यांच्याकडे 2.5 ते 3 एकर क्षेत्रामध्ये सोयाबीन पीक असते.

सरासरी त्यांना 7 ते 8 क्विंटल प्रति एकर सोयाबीन उत्पादन मिळते, त्यांना एक एकर सोयाबीन साठी 22 ते 24 हजार खर्च येतो.

चालू वर्षी परमेश्वर काकडे यांनी उन्हाळी सोयाबीन पीक घेतले. सोयाबीनचे संकरीत वाण फुले-किमया 753 ची 2 एकर क्षेत्रामध्ये टोकण पध्दतीने पेरणी केली. सायोबीनची उगवण चांगली होण्यासाठी त्यांनी बायोफिट स्टिमरिचची बीजप्रक्रिया केली. त्यामुळे उगवण 95% पेक्षा जास्त झाली.

उगवणीच्या 20 दिवसानंतर त्यांनी बायोफिट स्टिमरिच, बायो-99 आणि बायोफिट शेत यांची फवारणी घेतली. त्यानंतर फुटण्याच्या अवस्थेमध्ये, फुलकळीच्या अवस्थेमध्ये आणि शेंग भरण्याच्या अवस्थेमध्ये त्यांनी बायोफिट उत्पादनांचा वापर केला. बायोफिट उत्पादनांच्या वापरामुळे चालू हंगामामध्ये सोयाबीन पिकाची वाढ खूप छान झाली. फुटव्यांची संख्या वाढली. फुलगळ कमी झाली व शेंग चांगली भरली. चालू हंगामामध्ये सोयाबीनचे विक्रमी उत्पादन त्यांना मिळाले.
पुर्वीचे सोयाबीन पीक व बायोफिट सोयाबीन पिकामधील फरक
पुर्वीचे सोयाबीन पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु.24,000
  • सरासरी उत्पादन/एकरः 7.5 क्विंटल
  • बाजारभाव/क्विंटलः रु. 3600
  • एकूण उत्पन्न/एकरः रु. 27,000
  • निव्वळ नफा/एकरः रु. 3000
बायोफिट सोयाबीन पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु. 30,000
  • सरासरी उत्पादन/एकरः 12.5 क्विंटल
  • बाजारभाव/क्विंटलः रु. 4300
  • एकूण उत्पन्न/एकरः रु. 53,750
  • निव्वळ नफा/एकरः रु. 23,750
सोयाबीन पीक घेत असताना रासायानिक खतांवरील खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी त्यांनी बायोफिट एन.पी.के. व शेत यांचे दोन डोस पाटपाण्यामधून दिले. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली. तसेच जमिनीमधील अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढली. चालू हंगामामध्ये काकडे यांना विक्रमी 12.5 क्विंटल प्रति एकर सोयाबीन उत्पादन मिळाले.