logo
back-arrow
श्री. राजकुमार पद्माकर वाघ
सांगली, महाराष्ट्र.
 
एकूण पक्षीः 9 हजार
display-image
श्री. राजकुमार वाघ हे एक होतकरू आणि प्रयोगशील शेतकरी आहेत. शेती सोबत जोडधंदा म्हणून त्यांनी 5 वर्षांपूर्वी कुक्कुटपालन व्यवसाय सुरु केला आहे.

कुक्कुटपालनासाठी त्यांनी जवळपास 10 हजार कोंबड्यांकरिता अत्याधुनिक शेड उभी केली आहे. त्यांच्याकडे ब्रॉयलर जातीच्या कोंबड्या आहेत. श्री. वाघ वर्षातून 5 ते 6 बॅचेस घेतात.

कुक्कुटपालनात श्री. वाघ यांना नेहमी सतर्क रहावे लागते. वातावरणामधील अचानक झालेले बदल, त्याचा पक्ष्यांवरती होणारा परिणाम, बाजारभाव, पक्ष्यांचे लसीकरण आणि त्यांना वेळोवेळी देण्यात येणारा पोषक आहार इत्यादींसाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते.
तरीसुध्दा प्रत्येक ब्रॉयलर बॅच मध्ये काही प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू होत असे. बाजारभावाप्रमाणे पक्ष्यांचे वजन भरण्याकरता त्यांना 45 ते 46 दिवस लागत असत.

श्री. वाघ यांनी मागील बॅच मध्ये ब्रॉयलर पक्ष्यांसाठी दैनंदिन आहारासोबत नेटसर्फ कंपनीचे बायोफिट सी.एफ.सी. प्लस हे उत्पादन वापरले. ब्रॉयलर पक्ष्यांचे वय 1 ते 8 दिवसांचे असताना वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांच्या आहार व लसीकरणाचे एक वेळापत्रक बनवले. काही दिवसातच त्यांना पक्ष्यांच्या सुयोग्य आरोग्य, विकास आणि वजनामध्ये वाढ आढळून आली.
पुर्वीचे कुक्कुटपालन व बायोफिट सी.एफ.सी कुक्कुटपालन यांतील फरक
पुर्वीचे कुक्कुटपालन:
  • उत्पादन खर्च: रु.2,80,000
  • पक्ष्यांचा मृत्यूदर/बॅचः 9% ते 10%
  • सरासरी वजन/पक्षीः 2.1 किलो
  • खाद्यामध्ये झालेली बचतः नाही
  • एकूण फायदाः रु. 43,000
बायोफिट सी.एफ.सी कुक्कुटपालन:
  • उत्पादन खर्च: रु.2,76,000
  • पक्ष्यांचा मृत्यूदर/बॅचः 4% ते 5%
  • सरासरी वजन/पक्षीः 2.25 किलो
  • खाद्यामध्ये झालेली बचतः रु.19,000
  • एकूण फायदाः रु.73,000
9 हजार ब्रॉयलर कुक्कुटपालनासाठी बायोफिट सी.एफ.सी. प्लसचे बरेच फायदे झाले.

ब्रॉयलर पिलांचा मृत्यूदर कमी झाला. पक्ष्यांच्या पचनसंस्थेमध्ये सुधारणा झाली. त्यांचे अन्न रुपांतरण प्रमाण वाढले त्यामुळे पक्ष्यांचे वजन वाढले. त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढली. परिणामी, 45 ते 46 दिवसांच्या बॅचला 42व्या दिवशी बाजारपेठेप्रमाणे अपेक्षित वजन मिळाले आणि शेवटच्या 3-4 दिवसांच्या खर्चामध्ये बचत झाली.