logo
back-arrow
श्री. तुषार चौधरी
अमरावती, महाराष्ट्र.
 
पिकाचा प्रकार : संत्री
display-image
तुषार श्रीराम चौधरी हे गेल्या 20 वर्षांपासून शेती करत आहेत. यांच्याकडे 10 वर्षांपासून ‘नागपूर संत्रा’ जातीची फळबाग आहे. त्यांनी 6 एकर बागेमध्ये एकूण 650 संत्र्याची झाडे आहेत. प्रत्येक वर्षी त्यांना प्रति एकरासाठी साधारणतः रुपये 65 हजार खर्च येतो. तसेच फळ गळून जाणे, करपा रोग यामुळे त्यांचे बरेच नुकसान होते. त्याचप्रमाणे शेणखत उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना खर्चिक रासायनिक खतांचा वापर करावा लागत असे. याचा परिणाम त्यांच्या नफ्यावर होत असे.
चालू वर्षी तुषार चौधरी यांनी नेटसर्फ कंपनीच्या बायोफिट उत्पादनांचा वापर संत्रा पिकासाठी केला. बायोफिट स्टिमरिच, बायो-99 यांची फुलकळी येण्याच्या सुरुवातीला आणि (बेरीसाईज) छोटी फळधारणा झाल्यानंतर 2 वेळा फवारणी घेतली. त्याचा फायदा त्यांना जास्तीत जास्त फुलांचे-फळांमध्ये रुपांतर होण्यासाठी झाला. त्यामुळे फुलगळ व फळांची गळती कमी झाली.

शेणखत व रासायनिक खताला पर्याय म्हणून त्यांनी बायोफिट एन.पी.के. व बायोफिट शेत यांचा एक महिन्याच्या अंतराने ठिंबक सिंचनाद्वारे 4 वेळा वापर केला. त्यामुळे शेणखत उपलब्धतेची अडचण व रासायनिक खतांवरील खर्च यांचे योग्य नियोजन त्यांना करता आले.
पूर्वीची संत्र्याची शेती आणि बायोफिट संत्र्याची शेती यांमधील फरक-
पूर्वीची संत्रा शेती:
  • उत्पादन खर्च प्रति एकरः रु. 65,000
  • सरासरी उत्पादन प्रति एकरः 8 टन
  • बाजारभाव प्रति क्विंटलः रु 3,000
  • एकूण उत्पादन प्रति एकरः रु 2,40,000
  • निव्वळ नफा प्रति 1 एकरः रु 1,75,000
बायोफिट संत्रा शेती:
  • उत्पादन खर्च प्रति एकरः रु. 70,000
  • सरासरी उत्पादन प्रति एकरः 11 टन
  • बाजारभाव प्रति क्विंटलः रु 4,100
  • एकूण उत्पादन प्रति एकरः रु 4,51,000
  • निव्वळ नफा प्रति 1 एकरः रु 3,81,000
त्यांनी बायोफिट रॅपअप आणि इन्टॅक्ट यांच्या 2 वेळा वेगवेगळ्या दिवशी फवारण्या घेतल्या. त्यामुळे रसशोषक किड व बुरशीजन्य रोगांवरती प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फायदा झाला. मागील वर्षी पेक्षा चालू वर्षामध्ये फळांची संख्या जास्त मिळाली. तसेच मालाचा दर्जा सुध्दा सुधारला.

या वर्षात प्रत्येक झाडापासून त्यांना 900 ते 1000 फळे मिळे मिळाली. चालू वर्षी त्यांना 10 ते 11 टन प्रति एकर क्षेत्र पीक उत्पादन मिळाले.