logo
back-arrow
श्री. विजय भैरवनाथ धनावडे
सातारा, महाराष्ट्र.
 
एकूण क्षेत्र: बागायती - 5 एकर
display-image
विजय भैरवनाथ धनावडे हे त्यांच्या गावामधील पदवीधर शेतकरी असून शेतीमध्ये नगदी पिकांवर जास्त भर देत असतात. शेतीमधील उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी गेल्या 2-3 वर्षांपासून त्यांनी स्ट्रॉबेरी पिकाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. स्ट्रॉबेरी उत्पादन घेत असताना त्यांचा रासायनिक खतांवर खूप खर्च होत असे. तसेच रसायनांच्या अती वापरामुळे पीक कमकुवत बनत असे. फळांची टिकवण क्षमता कमी झाल्यामुळे त्यांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसे. चालू हंगामामध्ये श्री. धनावडे यांनी स्ट्रॉबेरीचे दोन वाण (फळ लवकर देणारी व उशिरा देणारी) अश्या विंटर व आर-1 जातीच्या रोपांची लागण मचिंग पेपर वर केली. सुरुवाती पासून त्यांनी पिकाची मशागत करत असताना बायोफिट उत्पादनांचा वापर केला.
बायोफिट एन.पी.के. व बायोफिट शेत प्रत्येकी 200 मिली/100 लि. पाण्यातून त्यांनी 15 दिवसांच्या अंतराने 5 वेळा वापर केला. त्यामुळे रासायनिक खतांवरील अतिरिक्त खर्च कमी झाला तसेच जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली. स्ट्रॉबेरी पिकाची शाखीय वाढ, फुलकळी व फळधारणा चांगली होण्यासाठी त्यांनी बायोफिट स्टिमरिच + बायो 99 च्या दर 15 दिवसांनी फवारण्या घेतल्या. बुरशीजन्य रोग व रसशोषण करणार्‍या कीटकांचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बायोफिट रॅपअप आणि इन्टॅक्ट यांच्या वेगवेगळ्या फवारण्या 15 दिवसांच्या अंतराने घेतल्या. त्यामुळे रासायनिक औषधांचा वापर कमी झाला. पिकाची नैसर्गिक रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत झाली. तसेच फळाची टिकवण क्षमता वाढली.
पुर्वीचे स्ट्रॉबेरी पीक व बायोफिट स्ट्रॉबेरी पिकामधील फरक
पुर्वीचे स्ट्रॉबेरी पीक :
  • उत्पादन खर्च/10 गुंठेः रु.1,05,000
  • सरासरी उत्पादन/10 गुंठेः 4500 कि.
  • बाजारभावः रु. 70 किलो
  • एकूण उत्पन्न/10 गुंठेः रु.3,15,000
  • निव्वळ नफा/10 गुंठेः रु.2,10,000
बायोफिट स्ट्रॉबेरी पीक :
  • उत्पादन खर्च/10 गुंठेः रु.1,07,000
  • सरासरी उत्पादन/10 गुंठेः 5200 कि.
  • बाजारभावः रु. 90 किलो
  • एकूण उत्पन्न/10 गुंठेः रु.4,68,000
  • निव्वळ नफा/10 गुंठेः रु.3,61,000
स्ट्रॉबेरी फळांना नैसर्गिक रंग, रसरशीतपणा व टिकवणक्षमता वाढल्यामुळे त्यांना चालू हंगामामध्ये उच्चांकी भाव मिळाला.