logo
back-arrow
श्री. योगेश सुधाकर रोकडे
श्रीरामपूर, महाराष्ट्र.
 
एकूण क्षेत्र/एकरः 4 बागायती
display-image
योगेश रोकडे हे एक पदवीधर, युवा शेतकरी असून प्रत्येक वर्षी ते रब्बी हंगामामध्ये कांदा पीक घेतात. हे पीक घेत असताना रोग व किडीच्या प्रादुर्भावामुळे कांदा पिकाची वाढ खुंटत असे, कांदा लहान आकाराचा मिळत असे. त्यामुळे त्यांना बाजारभाव कमी मिळत असे.

श्री. रोकडे यांनी कांदा (वाण-पंचगंगा) पिकाची रोप लागण 1 एकर क्षेत्रावर गादीवाफा पध्दतीने 15*10 सें.मी. अंतरावर केली.

लागवडीनंतर 15 दिवसांनी बायोफिट एन.पी.के. व शेत 1 लि. प्रत्येकी 200 लि. पाण्यामध्ये मिसळून 1 एकर क्षेत्रासाठी पाटपाण्याद्वारे दिले. पुन्हा 30 दिवसांच्या अंतराने वरील डोस दिला. तर बायोफिट एन.पी.के. व बायोफिट शेतमुळे जमिनीमध्ये सुध्दा उपलब्ध अन्नद्रव्यांचे अवशोषण वाढले. जमिन भुसभूशीत झाली. त्यामुळे कांदा पोसवण्यासाठी त्याचा खूप फायदा झाला.

कांदा पिकावर येणार्‍या रसशोषक कीड व त्या किडीमुळे होणारे रोग यांच्या प्रतिबंधात्मक उपायासाठी त्यांनी बायोफिट इन्टॅक्ट व बायो-99 च्या 20 दिवसांच्या अंतराने 3 वेळा फवारण्या घेतल्या. त्यामुळे चालू रब्बी हंगामामध्ये त्यांच्या कांदा पिकावर किडीचा प्रादुर्भाव कमी झाला. तसेच त्यांच्या रासायनिक किटनाशकांवर होणारा खर्च कमी झाला.
पुर्वीचे कांदा पीक व बायोफिट कांदा पिकामधील फरक
पुर्वीचे कांदा पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु.50,000
  • सरासरी उत्पादन/एकरः 105 क्विं
  • बाजारभाव/क्विंटलः रु.800 क्विं
  • एकूण उत्पादन/एकरः रु.84,000
  • निव्वळ नफा/एकरः रु.34,000
बायोफिट कांदा पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु. 55,000
  • सरासरी उत्पादन/एकरः 130 क्विं
  • बाजारभाव/क्विंटलः रु.900 क्विं
  • एकूण उत्पादन/एकरः रु.1,17,000
  • निव्वळ नफा/एकरः रु.62,000
कांदा पिकाच्या सुयोग्य वाढीसाठी उत्पादनामध्ये वृध्दी होण्यासाठी त्यांनी वाढीच्या प्रमुख अवस्थांमध्ये बायोफिट स्टीमरिच व बायो-99 च्या 20 दिवसांच्या अंतराने 4 वेळा फवारणी घेतल्या. त्यामुळे चालु वर्षी त्यांना उत्पादनामध्ये 20-25% वाढ मिळाली आणि बाजारभावसुध्दा चांगला मिळाला.