logo
back-arrow
डॉ. गणेश श्रीरंग पोटे
जालना, महाराष्ट्र.
 
एकूण क्षेत्र/एकरः 10 बागायती
display-image
डॉ. गणेश श्रीरंग पोटे हे एक वैद्यकीय पदवीधर असून आवड म्हणून शेतीचा व्यवसाय करतात. पारंपारीक पध्दतीने शेती न करता, व्यवसायाभिमुख शेतीकडे त्यांचा कल असतो.

दरवर्षी ते 10-11 क्विंटल प्रति एकर सोयाबीनचे पीक घेतात. पीक घेत असताना पिकावर येणारी किड जसे पाने खाणारी अळी, शेंग पोखरणारी अळी इ. आणि रोग जसे तांबेरा यांचा प्रामुख्याने बंदोबस्त करावा लागत असे.

चालू खरिप हंगामामध्ये डॉ. पोटे यांनी 2 एकर क्षेत्रावर सोयाबीन (वाण ग्रीनगोल्ड 3344) बियाणे टोकण पध्दतीने पेरणी केली. सोयाबीन उगणवणीनंतर त्यांनी बायोफिट स्टीमरिच व बायो-99 च्या 4 वेळा पीक वाढीच्या मुख्य अवस्थांमध्ये फवारण्या घेतल्या. त्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ सुयोग्य झाली, फुटव्याचे प्रमाण वाढले, फुलकळीची संख्या वाढली, फुलगळ कमी झाली, सोयाबीन शेंग चांगली भरली.

तसेच सोयाबीन पिकावर तांबेरा व इतर जीवाणूजन्य रोग येऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बायोफिट रॅपअपच्या 15 दिवसांच्या अतंराने फवारण्या घेतल्या. त्यामुळे इतर शेतकर्‍याच्या तुलनेमध्ये त्यांच्या सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला.
पुर्वीचे सोयाबीन पीक व बायोफिट सोयाबीन पिकामधील फरक
पुर्वीचे सोयाबीन पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु.23,000
  • सरासरी उत्पादन/एकरः 11 क्विं
  • बाजारभाव/क्विंटलः रु.3500 क्विं
  • एकूण उत्पादन/एकरः रु.38,500
  • निव्वळ नफा/एकरः रु.15,500
बायोफिट सोयाबीन पीक :
  • उत्पादन खर्च/एकरः रु. 28,000
  • सरासरी उत्पादन/एकरः 14 क्विं
  • बाजारभाव/क्विंटलः रु.5800 क्विं
  • एकूण उत्पादन/एकरः रु.81,200
  • निव्वळ नफा/एकरः रु.53,200
चालू खरीप हंगामामध्ये डॉ. पोटे यांना सोयाबीन पिकामध्ये कमालीचा बदल पाहायला मिळाला. चालू वर्षी त्यांना 14 क्विंटल प्रति एकर सोयाबीन उतारा मिळाला. सोयाबीन चांगला पोसावल्यामुळे त्यांना मालाची प्रतवारी चांगली मिळाली. तसेच बाजारामध्ये सोयाबीनची आवक कमी असल्यामुळे त्यांना बाजारभाव सुध्दा चांगला मिळाला.